चिकूपिकू हे छोट्या म्हणजे १ ते ८ वयोगटातल्या मुलांसाठीचं पहिलंच मराठी मासिक आहे. विविधांगी बुद्धिमत्ता (Multiple intelligence) या थिअरीवर आधारित असं हे मासिक दर महिन्याला भरपूर नवीन मराठी गोष्टी, गाणी, कोडी घेऊन घरपोच येतं. मुलं आणि पालक यांना एकत्र गोष्टी वाचत, सुंदर चित्रं बघत आणि काढत, तसंच हातांनी ऍक्टिव्हिटीज, सोपी खेळणी बनवत क्वालिटी टाईम घालवता यावा असा चिकूपिकूचा प्रयत्न असतो.
(ChikuPiku is a Marathi storybook series for kids/ Childrens based on multiple intelligence theory and it helps the children to nurture creativity and encourages brain-based learning through stories and activities.)